राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी मेणवली यांच्या मार्फत स्व लक्ष्मणराव पाटील तात्या यांच्या जयंतीनिमित्त मेणवली याठिकाणी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले.
सातारा जिल्ह्याचे जेष्ठ नेते आमचे मार्गदर्शक माजी खासदार स्व.लक्ष्मणराव पाटील (तात्या)
यांची आज जयंती त्यानिमित्ताने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेणवली व ग्लोरी चिल्ड्रन्स अॅकडमी मेणवली याठिकाणी निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अंगणवाडीतील लहान मुलांसाठी धावणे व चमचा लिंबु या सारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या साठी आज युवा उद्योजक मा.श्री तुकाराम शेठ जेधे , मा श्री अनुपम जाधव (पाटील), मा.सौ लक्ष्मी वेदपाठक (सरपंच ग्रा.पं.मेणवली), मा.सौ सुषमा चौधरी (सदस्या ग्रा.पं.मेणवली), मा.श्री पांडुरंग चौधरी , मा.श्री अक्षय निंबाळकर (उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस वाई तालुका), मा.श्री मधुकर चौधरी (अध्यक्ष जनाई एज्युकेशन ट्रस्ट) मा.श्री विजय काटे , मा.सौ राधीका जाधव (शिक्षण समिती अध्यक्षा), मा.श्री तुलसीदास काटे, मा श्री युवराज चौधरी, मा श्री संदिप वाईकर, मा श्री समिर काटे , श्री अजय वाईकर , श्री प्रतिक हरचुंदे, संकेत हरचुंदे, अभिजित निंबाळकर, अक्षय निंबाळकर, अक्षय काटे तसेच ग्रामस्थ सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका कर्मचारी यांच्या उपस्थितीत माजी खासदार स्व. लक्ष्मणराव पाटील तात्या याच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली व कार्यक्रमास सुरुवात झाली.
मा.श्री तुकाराम शेठ जेधे व मेणवलीच्या विद्यमान सरपंच मा.सौ वेदपाठक मॅम यांनी अतिशय सुंदर अशा शब्दात मुलांना मार्गदर्शन केले व तात्यांच्या अठवणींना उजाळा दिला. तसेच तोच वारसा जपत आज समाजात जननायक आमदार मकरंद आबा पाटील तसेच मा.श्री नितीन काका पाटील अहोरात्र समाजहितासाठी कशा पद्धतीने धावत आहेत व समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी तात्यांचे कुटुंब खंबीर पणे उभे असते हे देखील आपण पाहतो आहेच हे सुद्धा बोलताना सांगितले.
मुलांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे या स्पर्धेत सहभाग नोंदविला .
या स्पर्धांमध्ये नंबर मिळविलेल्या विद्यार्थ्यांना ट्राॅफी देऊन सन्मानीत करण्यात आले तसेच सर्व लहान मुलांना वही पेन्सिल देऊन त्यांचे ही कौतुक करण्यात आले त्यानंतर सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
शालेय समिती शिक्षक विद्यार्थी यांच्या मार्फत आयोजकांचे आभार माणुन सन्मान करण्यात आला व शेवटी पुन्हा एकदा माजी खासदार स्व लक्ष्मणराव पाटील यांच्या स्मृतीस विनंम्र अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता झाली.