फलटण महिला राष्ट्रवादीकडून निवेदन : कोरेगावमध्ये पदाधिकाऱ्यांकडून निषेध
फलटण प्रतिनिधी:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरुद्ध सांगोला व कुर्डुवाडी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकत्यांनी प्रतिमेचे दहन करून केलेल्या आंदोलनाच्या
निषेधार्थ कारवाई करण्याची मागणी फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने निवेनाद्वारे करण्यात आली आहे.
दिंनाक १ मार्च २०२३ रोजी प्रांताधिकारी शिवाजी जगताप, तहसीलदार समीर यादव आणि फलटण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक दादासाहेब पवार यांना फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरुद्ध सांगोला व कुर्डुवाडी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकत्यांनी जाणीवपूर्वक हेतुपुरस्कृत श्रीमंत रामराजे यांच्या बद्दल जनतेमध्ये गैरसमज निर्माण करून त्यांची बदनामी केली असून सांगोला येथे त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. तसेच कुर्डुवाडी येथे त्यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले असे कृत्य करून समाजामध्ये अशांतता पसरविणाऱ्या व कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या प्रवृत्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. अन्यथा आम्हाला देखील जशास तसे उत्तर द्यावे लागेल व आमच्या या कृत्यामुळे अशांतता पसरल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. समाजामध्ये अशांतता पसरवणाऱ्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी व योग्य ती कार्यवाही व्हावी असे या निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी महिला सौ रेश्मा राजेंद्र भोसले, सौ लतिका हरिभाऊ अनपट, सौ राजश्री शहाजी शिंदे, सौ भावना माणिकराव सोनवलकर, सौ नूरजहां दस्तगीर सय्यद, सौ सपना कोरडे, सौ प्रतिभा उत्तमराव चौधरी, सौ रेखा अनिल माने, सौ स्मिता राजेश खरात, सौ उर्मिला जयदीप काटे, सौ स्वाती गजानन नाळे, सौ लता अनिल यादव, सौ गितांजली नावरे, सौ अनिता कर्वे, सौ पूनम भिसे, सौ माया पवार, सौ सुवर्णशीला कांबळे इत्यादी महिला उपस्थित होत्या.