उंब्रज-प्रतिनिधी :
उंब्रज येथे रेशन दुकानदारास माहिती अधिकाराचा धाक दाखवून बंडा उर्फ महेश यशवंत काशीद , रा. काशीद गल्ली , उंब्रज , ता , कराड , जि. सातारा याच्यावर रेशन दुकानदार शरद राजगुरू शहा रा. चरेगाव , ता , कराड , यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उंब्रज पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , उंब्रज व चरेगाव येथील रेशन दुकानाची सुमारे 3 वर्षाची रेशन वाटपाबाबतची माहिती , बंडा उर्फ महेश यशवंत काशीद यांनी तालुका पुरवठा अधिकारी , कराड यांच्याकडे माहिती अधिकार कायद्या अंतर्गत माहिती मागवली होती , त्यानुसार फिर्यादी शरद शहा यांनी माहिती झेरॉक्स काढण्यासाठी सुमारे 12,000 रु खर्च अपेक्षित असल्याचे पुरवठा शाखेला कळवले असता , पुरवठा शाखेकडून बंडा काशीद यांना तुमच्या दुकानाचे दप्तर पाहायचे आहे व त्यांना ते दाखवावे असे शहा यांना सांगितले , चर्चेवेळी तुमच्या चरेगाव व उंब्रज येथील दुकानाबाबत माझ्याकडे तक्रारी आल्या असल्याने , तुम्हाला संपूर्ण माहिती द्यावी लागेल , नाहीतर मी तुमचे दुकान घालवीन , अशी भिती दाखवून दमदाटी केली , यावेळी वरून धान्यपुरवठा कमी असल्याने त्या महिन्यात लोकांना कमी धान्य वाटल्याचे सांगितले , बंडा काशीद याने सदरचा अर्ज निकाली काढण्याबाबत पुरवठा शाखेस अर्ज पाठवला त्यानंतर 8-10 दिवसांत बंडा काशीद याने फोन करून फिर्यादी यांना , हप्ता म्हणून दर महिना एक गव्हाचे पोते , एक तांदळाचे ठीके व 2/4 हजार रुपये द्यावे लागतील असे फोन करून धमकावून सांगितले , असे फिर्यादीत म्हटले आहे , याबाबत अधिक तपास उंब्रज पोलीस स्टेशनचे एस.के.पवार करत आहेत
उंब्रज पोलीस स्टेशन च्या वतीने ए.पी.आय अजय गोरड यांनी सर्व नागरिकांना माहिती अधिकाराचा वापर करून कोणी खंडणी मागत असेल तर उंब्रज पोलीस स्टेशन ला तक्रारी नोंदवन्याबाबत आवाहन केले आहे






















