*रोखठोख नितीन जाधव* *मंञालय मुख्य संपर्क प्रमुख* *महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ,मुंबई*
म्यानातूनि उसळे तरवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात ..या ओळी भरपूर काही सांगून जातात .भले तुम्ही कितीही ताकदवान,शक्तीशाली असा किंवा नसा अगर लय कशाची खुमखुमी ,कुणाचा आशीर्वाद मिळाला म्हणून घङत असेल तर शून्यात जाल .छञपती शिवरायांचे मावळे आहोत डोक्यात बसल तर रोखणारे तुम्ही कोण , परिस्थिती काय होईल याचे भान नाही काय? कर्णाटकातील बेळगाव येथिल मनगुत्ती गावातील छञपती शिवरायांचा पुतळा रातोरात हटवताय काय ? सडीक पडीक कोण नटी महाराजांचा एकेरी उल्लेख करते काय , भलतेच लोक वैयक्तिक स्वार्थापोटी शिवरायांच्या नावाचा वापर करतात काय …अरे गप्प पडा की कशाला नाद करताय भल्या भल्यांची हवा गूल होईल छञपती शिवाजी महाराजा समोर माझ्या बांधवांना कोणता पक्ष, संघटना ,राजकीय पद ,सत्ता ही गौण आहे.
मराठा समाज ईतर समाजातील सर्वांना सोबत घेऊन सहकार्य करत भेदभाव न करता कार्य करताना नेहमी दिसतो .परंतु सध्या याच समाजा ला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे डिवचण्याचे सञ पहावयास मिळते मग ते राजकीय ,सामाजिक ,धार्मिक ,असो अथवा अन्य भिन्न विषयातून सुटके फुटके मंडळी अथवा काही नेते मुस्काड चालवताना दिसतात .सकल मराठा समाज अशा बाबी कदापी खपवून घेणार नाही. लक्षात राहू द्या मराठे जागे आहेत .आता एक मराठा एक कोटी मराठा आहे.भले आम्ही मतभिन्न असू,वेगवेगळ्या पक्षात ,आवडीनिवडी च्या क्षेत्रात काम करत असू पण गाफील नाही उठसूठ छञपती चा विषय घेऊन राजकारण करणे ,जातीभेदाला आमंत्रण देणे ,एकात्मतेला तडा जाणाऱ्या गोष्टी करत राहून डोकी भडकवण व स्वतःची पोळी भाजून घेण हे आता संपल आहे .तरीही रक्त खवळायचा प्रयत्न कराल तर ईतीहासाची पुनरावृत्ती होण्यास वेळ नाही मराठ्यासह सर्व जातीधर्माला एकञ करून समाजात तेढ निर्माण करणारे समाजकंटक ,तशा फुटकळ संघटना ,स्वयंघोषित मंडळींना धडा शिकवावा लागेल .मनगुत्ती येथिल शिवरायांचा पुतळा का हटवला ? स्थानिक प्रशासन ,तीन गावातील समाज मंडळी ,तहसील तालुका प्रशासन यांनी काय निर्णय घ्यावा एवढया पूरता हा मर्यादित विषय वाटतो का? कर्णाटक सरकारने अशी पावले एकाएकी का उचलली ? तसेच आठवड्या भरात स्थानिक बैठक घेऊन नंतर पुतळा बसवतील अशा बातम्या येत आहेत हे चाललय काय…
सध्या कोरोना महामारीने सबंध देशाला परेशान करुन सोडले आहे मृत्यू ने कवटाळले आहे, सर्वांना अङचणी आहेत आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत असताना महापुरुषांच्या नावाभोवती समाजाला गुंतवून ठेवण्याची रणनिती वापरली जात असल्याचे दिसते.अशा प्रवृत्ती ला समाज ठेचून काढल्या शिवाय राहणार नाही व राजकारण करणार्यांना घरचा रस्ता नक्की दाखवणार. आरे ,…ज्या शिवरायांच्या युध्दनिती चा गणिमीकाव्याचा ,स्वराज्य प्रेरणेचा अभ्यास जगातील संशोधक करतात त्यांना सुध्दा शिवरायांची युध्दनिती व पराक्रम अजून समजू शकला नाही तर तुम्ही कोण …छञपती शिवाजी महाराज सबंध हिंदुस्थानातील जनतेच्या मनात ह्रदयात आहेत तसेच सर्व जग छञपतीच्या शौर्याला ,त्यांच्या स्वराज्याला मानाचा मुजरा करते .छञपती शिवराया सारखा सर्व जाती धर्माला समान न्याय देणारा हिंदवी स्वराज्याची निर्मिती करणारा विश्वपराक्रमी राजा पुन्हा होणे नाही ..महाराजांचा पुतळा हलवल्यामुळे त्यांची प्रेरणा विचार कमी होत नाहीत .परंतु सध्या काहींना सत्तेची नशा ,गर्व चढला असेल तर तो ही सर्व समाज बांधवांना एकत्र करून पुरता जिरवला जाईल हे निश्चित ..तुम्ही कुणीही असा छञपती आमचे दैवत आहे आमचे रक्त खवळू नका पुतळा लवकरात लवकर आहे त्या स्थळी बसवा ..जय जिजाऊजय शिवराय ..