पंतप्रधान मोदींना टिळक पुरस्कार देण्या बाबत महाराष्ट्र प्रदेश अणि राष्ट्रीय काँग्रेसच्या भूमिके कडे सर्वांचे लक्ष !! मोदींना “काँग्रेस च्या टिळक घराण्याने” अणि कौंग्रेस ची सर्व सर्वोच्च पदे भोगलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनी पुरस्कारासाठी शिफारस
दिल्याने निष्ठावंत काँग्रेसजनांची नक्कीच घोर निराशा व संताप देखील झाला आहे..!! एक ऑगस्ट टिळक पुण्यतिथी निमित्त नरेंद्र मोदींना पुण्यात देण्यात येणाऱ्या टिळक पुरस्कारा विरोधात
राष्ट्रीय अणि प्रदेश काँग्रेस ने भूमिका घ्यावी असे मत अनेक कोन्ग्रेस कार्यकर्ते अणि पदाधिकारी यांनी व्यक्त केले.
टिळकांनी 1920 पर्यंत कोन्ग्रेस चे जहाल नेतृत्व केले होते. आरएसएस ने मात्र ब्रिटिश धार्जिणे धोरण स्विकारले असे असताना पुणे शहरात असंख्य नेते, कार्यकर्ते अणि पदाधिकाऱ्यांमध्ये आरएसएसचे प्रचारक अणि भाजपा चे पंतप्रधान मोदी यांना टिळकांच्या नावाने पुरस्कार देण्यावरून असंतोष आहे. टिळक ट्रस्ट हा प्रामुख्याने..
(भाजपच्या दिवंगत मुक्ता टिळक वा शैलेंद्र टिळक यांचा नसुन)..
प्रामुख्याने..
डॅा दिपक टिळक त्यांचे वडील दिवंगत जयंतराव टिळक ( राज्यसभा सदस्य, माजी मंत्री व विधान परीषद सभापती – काँग्रेस) तदनंतर डॅा दिपक टीळक व त्यांचे चिरंजीव रोहीत टिळक (काँग्रेस नेते, एनएसयुआय प्रदेश अध्यक्ष, युवक काँग्रेस, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व २ वेळा कसबा विधान सभा ऊमेदवारी)
यांच्या “टिळक ट्रस्ट” चा आहे..!!
या मध्ये महत्वाचे व आक्षेपार्य हेच आहे की…
ज्या मोदींनी संविधान व लोकशाही विरोधी भूमिका घेत दिवंगत पंतप्रधान व काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, पं नेहरू, इंदीरा गांधी, राजीव गांधी ते सोनिया व राहुल पर्यंत अश्लाघ्य विधाने करत पातळी सोडुन टिका केली.. सतत काँग्रेस नेत्यांप्रती अडचणी निर्माण करीत, द्वेषपुर्ण वागणुक दिली..
त्या मोदींना हा पुरस्कार देणे म्हणजे स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्य सैनिकांची व लोकमान्यांच्या ब्रिटींश विरोधी भुमिकेची थट्टा आहे..! असे सर्व सामान्य कोन्ग्रेस कार्यकर्त्याला वाटते.
या देशभक्तीचा दर्जा देणारा.. राष्ट्र नायकांचे नांवे असलेला राष्ट्रीय पुरस्काराचा पुरेपूर उपयोग मोदी व भाजप येत्या निवडणुकीत करणार..!!
हे स्पष्ट आहे..!!
किंबहुना मोदी व भाजप ला निवडणुकीत वातावरण निर्मितीसाठी हे जीवदान ठरू नये.., वल्लभ भाई पटेल भाजपाने पळवले अणि स्वतः च्या गोटात नेले अणि आता टिळक.
मोदींना “काँग्रेस च्या टिळक घराण्याने”..
पुरस्कार दिल्याने.. निष्ठावंत काँग्रेसजनांची नक्कीच घोर निराशा व संताप झाला आहे..!! अशी तीव्र प्रतिक्रिया कौंग्रेसजन देत आहेत.
































