खंडाळा : आजकाल शेती – संपत्तीच्या वादातून लोक आपली नाती विसरतात आणि एकमेकांच्या जीवावर उठतात. अशीच एक घटना खंडाळा तालुक्यातील घडली आहे. यामध्ये शेतीच्या झालेल्या वादातून आरोपीने आपल्या चुलत भावाची हत्या केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,खंडाळा तालुक्यातील आहीरे या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या धायगुडे परिवारातील वडिलोपार्जित असलेल्या जमिनीच्या वादातून नेहमीच धूसपुस सुरू होती.संशयीत आरोपी ज्ञानेश्वर उर्फ नोन्या विलास धायगुडे व मयत मोहन सुरेश धायगुडे याच्यामध्ये आज शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात संशयित आरोपी यांनी आपल्याच चुलत भाऊ असलेले मोहन सुरेश धायगुडे यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.