महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी/ गणेश पवार :
फलटण येथील बेकायदेशीर कत्तलखान्यावर पोलिसांची छाप्याची मालिका सुरूच असून इरफान कुरेशी व नय्युम कुरेशी व अनोळखी पाच इसम यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ५(ब),९(अ)९(ब), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याची फिर्याद पो हवा मारुती लोलापोड यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली असून तिथून मिळालेल्या माहितीनुसार इरफान याकूब कुरेशी व नय्युम कुरेशी रा. मंगळवार पेठ उराशी मोहल्ला फलटण व त्यांचे पाच साथीदार हे दि ३/६/२०२१ रोजी ८ वाजन्याच्या सुमारास मंगळवार पेठ कुरेशी नगर फलटण येथे बेकायदेशीरित्या जनावरांची कत्तल करीत असताना आढळून आले व त्याठिकाणी १५००किलो गोमांस व कत्तल करण्यासाठी आणलेली जनावरे,एक बिगर नंबर महिंद्रा पिकप, मारुती ८००, एक मोटर सायकल, असा एकूण ९ लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची कारवाई अजयकुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा, धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक सातारा, तानाजी बर्डे उपविभागीय पोलिस अधिकारी फलटण यांचे मार्गदर्शनाखाली भारत किंद्रे पोलीस निरीक्षक, नवनाथ गायकवाड सहा. पोलीस निरीक्षक, सचिन राऊळ सहा पोलीस निरीक्षक, सहा. फौजदार भोईटे, पोलीस हवा ठाकूर, पो. ना. चातुरे, पो. ना. सूळ, पो. ना. लावंड, पो. ना. भोसले, पो.ना. वाडकर, पो. कॉ. बडे, पो. कॉ. लोलपोड यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पो उपनिरीक्षक अमोल कदम करत आहेत