सोमेश्वरनगर प्रतिनिधी. सध्या समाजात कोरोनाविषयी मोठ्या प्रमाणात गैरसमज असुन ते दुर झाले तर बहुतांश भिती कमी होईल असे मत बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यानी सोमेश्वरनगर येथे व्यक्त केले . स्वातंत्र्यदिनानिमित्त येथील बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ ,सोमेश्वरनगर च्या वतीने अहोरात्र झटणारे बारामती तालुका आरोग्य अधिकारी “कोरोना योद्धा” डॉ मनोज खोमणे यांचा सत्कार सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व सैनिकाद्वारे करणेत आला त्यावेळी ते बोलत होते. येथील आजी माजी सैनिक संघाद्वारे सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे हस्ते ध्वजारोहण करणेत आले सोमेश्वर कारखाना उपाध्यक्ष शैलेश रासकर ,शेंडकरवाडी पशुवैद्यकीय डॉ शेजवळ ,सरपंच वैभव गायकवाड,डॉ प्रदीप भोसले यांचेसह मोजक्या सैनिकामधे सोशल डिस्टनसींग चे पालन करून शनिवारी ७४ वा स्वातंत्र्यदिवस साजरा करणेत आला. डॉ . खोमणे पुढे म्हणाले कि बरेचदा एखाद्या नातेवाईक व्यक्तीचा मृत्यु झाला तर परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात येते नातेवाईक मृतदेह ताब्यात देखील घेत नाहीत प्रत्यक्षात मृतदेह हा कोरोना वाहक नसतो .त्यामुळे न घाबरता सोशल डिस्ट न्सींग चे पालन करुन मृत व्यक्तीचे सर्व उत्तरकार्य व विधी करता येवु शकतात. त्याचप्रमाणे तरुण वर्गाला त्यानी आव्हान केले कि काही दिवस त्यानी वयस्कर आई वडीलापासुन अंतर राखुन त्यांची काळजी घ्यावी आपल्याला कोरोनाची लक्षणे दिसायला वेळ लागु शकतो मात्र आपल्या वयस्कर आई वडीलाना त्याची त्वरीत लागण होवु शकते . थोडी जरी सर्दीची लक्षणे जाणवु लागली तरी त्वरीत तपासणी करुन घेणे गरजेचे आहे अन्यथा सात आठ दिवस झाल्यानंतर त्यावर उपचार करताना मर्यादा येवु शकतात. तपासणी चे नाव घेतले तरी अनेकजण घाबरतात मात्र तसे केल्यास आजार बळावण्याची शक्यता आहे.सर्वानी एस .एम .एस . चा वापर करावा एस म्हणजे सोशल डिस्ट न्सींग ,मास्क व सॅनिटायझर या बाबीचा अवलंब केला पाहीजे .कोरोनाचे युद्धात आम्हाला आत्ता योद्धा ही उपाधी मिळाली असली तरी सैनिक कायम योद्धा असतो असे सांगुन सर्वानी स्वत:ची काळजी घेवुन कोरोना युद्धात सहभागी व्हावे असे ते म्हणाले .पुरुषोत्तम जगताप यानी सैनिकांना व डॉक्टरांचे कार्य योद्ध्याप्रमाणेच असुन स्वातंत्र्यदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मान्यवरांचे स्वागत कार्याध्यक्ष अनिल शिंदे यानी केले तर बारामती तालुका क्रिडा अधिकारी यानी प्रास्ताविक केले सैनिक संघटनेच्या तक्रार निवारण समिती अध्यक्ष गणेश आळंदीकर यानी सैनिक संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला तर अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर यानी आभार मानले. यावेळी सैनिकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे बक्षीस देवुन सत्कार करणेत आले .तसेच पोलीस हवालदार महेंद्र फणसे ,पोलीस नागराळे ईं चा सत्कार करणेत आला.
कोरोनाच्या आजाराने होणारा मृत्यू पासून त्या मृतदेह चा कोणताही धोका नागरिकांना नसतो , कोण्हीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे सोमेश्वरनगर येथील आजी-माजी सैनिक च्या ध्वजारोहण प्रसंगी एक संदेश म्हणून आवर्जुन सांगितले. बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे.