महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (इंदापूर) : शहाजीराजे भोसले
बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुपोषणमुक्त भारत साठी “पोषण अभियान” हा महत्वकांक्षी कार्यक्रम सध्या राबविण्यात येत आहे . बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये या मोहिमेचा भाग म्हणून सकस आणि पोषण आहाराचे महत्त्व सांगणारा माहिती फलकांच्या माध्यमातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती करण्यात येत आहे.
दि.१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशभर ‘राष्ट्रीय पोषण महिना’ साजरा करण्यात येत आहे . या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोठी मोहीम राबविण्यात येत असून पोषणाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यात येत आहे . बावडा , लाखेवाडी ,बोराटवाडी , चाकाटी , पिठेवाडी , निर-निमगाव , कचरवाडी , सराटी , लुमेवाडी , गोंदि , ओझरे , गिरवी , पिंपरी बु,. नृसिंहपुर , भोडणी , वकिलवस्ती , सुरवड , शेटफळ-हवेली , भांडगाव व परिसरातील सर्व ग्रामपंचायती व आरोग्य सेविका , डाॅक्टर यांच्या माध्यमातून जनजागृती अभिमान राबविण्यात येत आहे .