लोणीभापकर प्रतिनिधी संजय कुंभार
महाराष्ट्रात सध्या टिक टॉक ॲपवर गाजत असलेला टिकटाॅक स्टार सुरज चव्हाण हा बारामती तालुक्यातील मोढवे गावचा असून त्याची घरची परिस्थिती खूपच हलाखीची आहे. तो लहान असतानाच त्याचे आई वडील वारले. तो सध्या आत्या व आपली लहान बहीण यांच्याकडे राहतो त्याचे वय सध्या २० वर्षे आहे व शिक्षण आठवी आहे. त्याच्या वडिलांचा व्यवसाय शेळी-मेंढीपालन होता.
तो गेली अनेक वर्ष छप्पराच्या पडक्या घरात राहत होता व आता त्याच्या काही मित्रांच्या मदतीने नवीन घरास सुरुवात केली आहे. त्याच्याकडे सुरुवातीला साधा मोबाईल ही नव्हता त्याने रोजंदारीवर काम करून हलकासा मोबाईल घेतला व टिक टाॅक या ॲपच्या माध्यमातून तो देशभरात प्रसिद्धीच्या झोतात आला. सध्या त्याच्या घराचे काम सुरू असून त्याने या माध्यमातून मदतीची अपेक्षा केली आहे.
भारत आणि चीन यांचे संबंध बिघडल्यामुळे चिनी बनावटीच्या ५९ अॅपवरती भारत सरकारने बंदी आणली आहे. टिक टॉक हे यापैकी एक अॅप असून टिक टॉक बंद झाल्यामुळे टिक टॉक करणाऱ्यांमध्ये नाराजी
पसरली असून भारत सरकारने देखील पुढाकार घेऊन टिक टॉक सारखे भारतीय बनावटीचे अॅप तयार करून संपूर्ण भारतातील तरुणांना व्यासपीठ उपलब्ध द्यावे अशी मागणी होत आहे.
ज्या दिवशी टिक टॉक ॲप बंद झालं त्यावेळेस त्याच्या डोळ्यातून पाणी आले व त्याने आपल्याला करमत नसल्याचे ही सांगितले. टिक टाॅक ने आपल्याला धोका दिला. बंद झालेल्या ॲप बद्दल तो आपल्यासाठी भारत देश महत्त्वाचा आहे टिक टॉक ॲप महत्त्वाचे नाही असेही बोलला.
सुरज याने प्रथम नऊ-दहा महिन्यापूर्वी भाच्याच्या मदतीने ल ला ली ला ला हे गाणं टिक टॉक वर टाकून प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर त्याने बुक्कीत टिंगुल,… गुलिगत,… एसक्यू आरक्यू झेडक्यू… असे अनेक व्हिडिओ सूरजने वायरल केले व त्याला खूपच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी भेटू लागली. १५ लाख फॉलोअर्स (वन पॉईंट फाईव्ह मिलियन डॉलर्स) मिळाल्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिले नाही परंतु सध्या टिक टाॅक बंद झाल्याने तो खूपच नाराज असल्याचे पाहायला मिळाले. लवकरच आता स्वदेशी बनावटीचे टिकटॉक सारखे एखादे ॲप लॉन्च व्हावे व त्याच्यावर आपण पुन्हा एकदा गोलिगत राडा करू असे सांगत स्वतः बद्दलची माहिती खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली.
सुरज याच्या घरासाठी पैलवान नानासाहेब मदने, आकाश वाघमारे, स्वप्निल खोमणे, हनुमंत रिठे, गणेश लाड, दादा लकडे यांनी मदत केल्याचे यावेळी सुरज चव्हाण याने सांगितले .