महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी / माण :
माण तालुक्यातील मार्डी येथील रेशनिंग दुकानात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी सातारा व माण तहसीलदार तसेच पुरवठा विभागाकडे निवेदनाद्वारे येथील दलित वर्गातील लोकांनी केला आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, ग्रामस्थ हे मार्डी ता. माण येथील रहिवाशी असून, गावातील रेशनिंग दुकानदार हे महिलांना व पुरुषांना उद्धट भाषेत उत्तर देतात, त्याचबरोबर मालाची पावती न देणे, दुकान वेळेवर न उघडणे, दुकानात दरपत्रक न लावणे, माल ज्यादा दराने देने अश्या तक्रारी आहेत. दि. 12/7/2020 रोजी सकाळी साडेनऊ वाजता सदर रेशनिंग दुकान हे पाठीमागील दरवाज्याने चालू होते. म्हणून सौ जयश्री शामराव सावंत या आपले रेशनिंग घेण्यासाठी गेल्या असता, त्यांना सांगण्यात आले की पुढील शटर चालू असल्यास रेशनिंग मिळेल. त्यांच्या समोर काही लोकांना पाठीमागील दरवाज्याने रेशनिंग वाटप चालू होते. सदर लोकांना जातीवाचक व उद्धट शब्द वापरण्यात आले. तक्रार पुस्तक मागितले असता उलट लोकांना दम दिला व ” माझे पुरवठा शाखेला हप्ते चालू आहेत, माझे कोण वाकडे करू शकत नाही ” असे रेशनिंग दुकानदार म्हणाले आहेत. सदर लोकांना न्याय न मिळाल्यास दुकानाला टाळे ठोकू असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.