महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी :
पुणे :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावीच्या 2020 परीक्षेचा निकालाची लिंक सुरु झाली आहे. मात्र या निकाला बाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या 2020 परीक्षेचा निकाल (Maharashtra board HSC result 2020) १५ जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरवर्षी बारावीच्या परीक्षेचा निकाल हा मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा कोरोना संकट आणि लॉकडाऊन यामुळे याला बराच उशीर झाला आहे. दरम्यान, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं आहे की, १५ ते २० जुलै दरम्यान १२वीचा निकाल जाहीर केला जाईल, असे . बारावीच्या परीक्षेचा निकाल आपण mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. यावेळी त्यांना आपला रोल नंबर आणि आईचं नाव टाकून ऑनलाइन निकाल पाहता येईल. दरम्यान, बारावीचा निकाल हा एसएमएसद्वारे देखील पाहता येणार आहे.
यंदा बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. मात्र, कोरोना संकटामुळे उत्तरपत्रिका तपासण्यास उशीर झाल्याने यंदा याचा परिणाम थेट निकाल जाहीर करण्यावर झाला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी २८ मे २०१९ रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता.