आई-वडील व श्री बिरोबा विद्यालयाच्या शिक्षकांच्या प्रयत्नांना यश
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : (बिदाल)
जन्मजात दिव्यांग असतानादेखील संघर्ष करत माण तालुक्यातील दुष्काळ असताना सुद्धा त्या दुष्काळावर शिक्षणाच्या माध्यमातून मात करण्यासाठी माणच्या मातीतील अस्सल हिरे आपला हार न मानण्याचा बाणा घेऊन यशश्री मिळवन्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. अशाच यशाला गवसणी घातली आहे पांगरी गावच्या श्री बिरोबा विद्यालयाच्या जयदीप उत्तम दडसने सतत संघर्ष करत दहावी मध्ये 83.20% टक्के गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
जयदीपचे प्राथमिक शिक्षण जि प प्राथमिक शाळा हणमंतमळा येथे झाले तो इयत्ता चौथीमध्ये असताना जन्मताच त्याला ताप येत होता त्यानंतर डॉक्टरचे उपचार सुरू असताना सातारा, बारामती,पुणे,कराड या ठिकाणी उपचार करण्यात आले परंतु त्याचा त्रास जास्त होत गेला त्यानंतर त्याने पाचवीला श्री बिरोबा विद्यालय पांगरी येथे प्रवेश घेतला त्याचे वडील श्री उत्तम शिवराम दडस त्याला दररोज शाळेत ने-आण करायचे त्याला प्रवासासाठी इतर सर्व गोष्टीसाठी रोजच्या मदतीची गरज होती. त्यांच्या पालकांनी खूप कष्ट केले.जयदीपला शाळेतील सर्व शिक्षकांनी योग्य गरजेनुसार मदत केली व परीक्षेच्या व अभ्यासाचा सराव सुद्धा करून घेतला .
पंचायत समिती माण येथील अपंग दिव्यांग समावेशित शिक्षण विभागाचे विशेष शिक्षक श्री.विजय महानवर सर यांनी वेळोवेळी शाळेला भेट देऊन त्याच्या अध्यापनात शिक्षकांना,पालकांना आवश्यक ते मार्गदर्शन केले. लेखनिक मिळवून देण्यासाठी शाळेने परीक्षा मंडळाकडे पत्रव्यवहार करून त्याला लेखनिक मिळवून दिला .सोबत त्याला महाराष्ट्र शासनाचा अपंग समावेशित शिक्षण विभागाकडून मदतनीस,लेखनिक व शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले.

जयदीप दडस हा दिव्यांग असताना देखील मिळवलेल्या या यशाचे कौतुक माण पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी सौ.सोनाली विभुते, विस्तार अधिकारी संगीता गायकवाड, श्री बिरोबा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कोंडिबा तांबे , केंद्रप्रमुख अंकुश शिंदे, अंपग समावेशीत विभागाचे तालुका समन्वयक श्री.रमेश गोरड सर, श्री.बापू काळेल सर, विशेष शिक्षक विजय महानवर सर आणि श्री बिरोबा विद्यालयाचे शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी व पांगरी गावातील ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.






























