बारामती प्रतिनिधी
वर्षभरापासून विविध गुन्ह्यात फरार असलेला काटक्या काँग्रेश्या भोसले (वय वर्ष ४७) या आरोपीला फलटण तालुक्यातील टाकळेवाडी येथे मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली आहे. फलटण तालुक्यातील टाकळवाडे येथे बारामती तालुका पोलिसांनी सापळा लावून अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपीवर ३०७ कलमासह अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोली हा गेल्या वर्षभरापासून फरार होता. सदर आरोपीस पकडण्याची कामगिरी बारामती गुन्हेशोध पथकाचे सपोनि योगेश लंगुटे,पोलीस नाईक सदाशिव बंडगर,पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव,विनोद लोखंडे,मंगेश कांबळे यांनी केली आहे.