महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
कराड शहर वाहतूक शाखेने शहराच्या हद्दीत असणाऱ्या महामार्गावर विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या दुचाकीस्वार व अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली.
जवळपास १०० वाहनावर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात आली या कारवाईत ३२ हजारांचा दंडही वसूल करण्यात आला.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामध्ये विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांसह मद्य प्राशन केलेल्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. त्याच बरोबर अवजड वाहनावरही कारवाई करण्यात आली. काही वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई वाहतूक शाखेच्या स.पो.नि. सरोजिनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.या कारवाईत सर्वच कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता.
या कारवाईसाठी कोल्हापूर नाका, वारुंजी फाटा, पाचवड फाटा, कोयना वसाहत फाटा तसेच खोडशी परिसरात वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली होती. दिवसभरात ६० वाहनावर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे बारा हजारांचा दंड ही वाहतूक शाखेने वसूल केला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर नाका, विद्यानगर, कृष्णा कॅनॉल, कार्वे नाका, येथेही कारवाई मोहीम राबविण्यात आली होती.




















