महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी /कराड: बनवडी ता.कराड ग्रामपंचायतीतर्फे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ग्रामपंचायत बनवडी येथे संपन्न झाला. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ करण्यात आला. भविष्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळावे यासाठी प्रोत्साहनपर पाठीवरती शाब्बासकीची थाप ग्रामस्थांच्या तर्फे मारण्यात आली.
येणाऱ्या काळामध्ये गावातील कोणत्याही विद्यार्थ्याला शैक्षणिक प्रकारची मदत लागली असेल तर त्यांनी ग्रामपंचायत मधील सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांना पैकी कोणालाही संपर्क करून मदत केली जाणार आहे गावचे जीवनमान उंचावणे व गावाचा लौकिक वाढवणे यासाठी काम करावे, असे आव्हान ग्रामपंचाय मार्फत करण्यात आले.
या वेळी सागर शिवदास सदस्य जिल्हा परिषद सातारा,प्रदिप पाटील सरपंच बनवडी ग्रामपंचायत विकासआण्णा करांडे उपसरपंच ग्रामपंचायत ज्येष्ठ सदस्य, मोहनराव जानराव पांडुरंग कोठावळे ग्रामपंचायत सदस्य,पल्लवी साळुंखे,विद्या शिवदास, स्वाती गोतपागर,पूजा चव्हाण,विस्ताराधिकारी सदाशिवगड बीट, रमेश कांबळे, दीपक हिंनुगले ग्रामसेवक बनवडी व गावातील ग्रामस्थ व मिलिंद गायकवाड ,भिकाजी कोठावळे, शंकर लाडे, संदीप माळी व ग्रामस्थ उपस्थित होते.