कराड: कराड नगरीचे आधुनिक शिल्पकार स्व.पी.डी.पाटीलसाहेब जयंतीदिनाचेऔचित्य साधून सौ.संगिता साळुंखे माई यांनी वाठार किरोली व सुर्ली येथील चार लहान मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेतले.
सध्या कोरोनाची दाहकता खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात संपूर्ण कुटुंबच्या कुटुंबे कोरोनामुळे आजारी पडत आहेत. कर्ते पुरुष निघून जातात, त्याचबरोबर घरातील पती-पत्नीही यात दगावत आहेत. यानंतर त्यांच्या मागे असणाऱ्या लहान मुलांचे हाल होतात. याची जाणीव ठेवून अशा कुटुंबांवर ओढवलेल्या आघातात मुलांना धीर देण्यासाठी सौ.संगिता साळुंखे (माई) या पूर्णपणे त्यांच्या पाठीशी राहणार आहे.