महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :फलटण
दि. 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास वीर धरणात 8380 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे वीर धरण सध्या 85% भरले असून येत्या 24 तासात वीर धरणातून नीरा नदीपात्रात केव्हाही पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास येत्या 24 तासात वीर धरणातून नीरा नदीला पाण्याचा विसर्ग करण्यात येईल त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे असा इशारा वीर धरणाचे अभियंता विजय नलवडे यांनी दिला आहे.