महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :बिलकीस शेख (लोणंद )
खंडाळा तालुक्यातील सावित्रीमाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव येथील सूर्यरत्न युथ फाऊंडेशन यांनी पर्यावरण संवर्धनासाठी देशी वृक्षांचे वृक्षारोपण केले.
नायगाव येथील सूर्यरत्न युथ फाऊंडेशन च्या वतीने नायगाव शिरवळ रोड व नायगाव केसुर्डी रोड या ठिकाणी पर्यावरण संवर्धनासाठी वेगवेगळ्या देशी वृक्षांचे रोपण करून पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण किती गरजेचे आहे हे दाखवून दिले. यावेळी सिताफळ, चिंच , आपटा अशा अनेकविध वृक्षांचे रोपण सूर्यरत्न युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष हितेश नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी नायगांवचे सरपंच सुधीर नेवसे, लिपिक विलास ननावरे, कर्मचारी नंदू सुतार, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक राजेंद्र अडगळे सर तसेच जाणीव फाउंडेशन अध्यक्ष विक्रम नेवसे, नवशक्ति तरुण मंडळ व गावातील सर्व तरुण मंडळांतील सभासदांचे विशेष योगदान लाभले.
या कार्यक्रमास सूर्यरत्न यूथ फाउंडेशन चे उपाध्यक्ष दत्तात्रय पवार, सचिव लक्ष्मण नेवसे, सहसचिव सागर नेवसे, गणेश जाधव, संदेश भुजबळ, भूपेंद्र दगडे, किरण पवार, विशाल सणगर, गुरूदेव कुरपड, सुजय नेवसे, मनिष गायकवाड़, वैभव कुंभार, सिद्धेश नेवसे, गणेश नेवसे, तुषार खरात, शिवनाथ सटाले, रोहन कानडे, सचिन रेवडे , ज्ञानदिप नेवसे, विनोद भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.