कराड : कार्वे-कोरेगाव मार्गावर भैरोबा मंदिराशेजारी असणाऱ्या उसाच्या शेतात अंदाजे 25 वर्षीय युवतीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी कार्वे-कोरेगाव मार्गावर भैरोबा मंदिरानजीक उसाच्या शेतात पंचवीस वर्षीय युवतीचा डोक्यात निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आला आहे. युवतीची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, उपनिरीक्षक भैरवनाथ कांबळे, भरत पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत. युवतीची ओळख पटवणे व मारेकऱ्यांचा तपास पोलीस करत आहेत.