महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले(कळंब – इंदापूर)
रेडणी गाव पाझर तलावातील अतिक्रमण तात्काळ काढण्याचे व त्याबाबतचा कार्यवाही अहवाल तातडीने या कार्यालयास सादर करण्याचे आदेश रेडणीचे सरपंच भीमराव काळे व ग्रामसेवक अंबिका पावसे यांना जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्या संदर्भात जलसंधारण उपविभाग इंदापूर जा.क्र./कावि/६७३/२०२०या पत्राने सरपंच , ग्रामसेवक याना आदेशांकीत केले आहे .रेडणी गावातील तलावात अतिक्रमणे करून तलाव नष्ट करण्याचे षडयंत्र या आदेशामुळे हाणून पडले आहे .या बाबत जिल्हा परिषदेचे लघु पाटबंधारे विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी व तालुक्याचे तहसीलदार , इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना पुढील माहितीसाठी व योग्य त्या कारवाही साठी पत्र दिल्याचे इंदापूरचे जलसंधारण अधिकारी यांनी माहितीसाठी कळविले आहे .
या पाझर तलावातील अतिक्रमणे हटवून सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई होण्यासाठीची बातमी दि. १४ ऑगस्ट २०२० ला “महाराष्ट्र न्यूज”मध्ये प्रसिद्ध झाली होती , त्याची दखल घेत गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्याबरोबर त्यांच्या दालनात चर्चा करून उपोषण मागे घेण्यास उपोषण कर्त्यांना विनंती केली होती , त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य दिनादिवशी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांचे होणारे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे .
यावेळी या सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त सहीने सदरच्या अतिक्रमण धारकांना अतिक्रमणे हटविण्याच्या नोटीसा देऊन तक्रारदारांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे .
सरपंच व ग्रामसेवक यांचा लेखी खुलासा मिळाला आहे , यामध्ये तक्रारदारांवर ग्रामपंचायतीच्या विरोधात तक्रार केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा लेखी खुलासा ग्रामसेवक अंबीका पावसे यांनी दिला आहे . त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या उपविभागीय जलसंधारण अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले आहेत .तर याच आदेशाच्या विरोधात गटविकास अधिकारी व तहशिलदार यांनी हि अतिक्रमणे हटवावीत असे या दोन अधिकारी यांना आम्ही कळविळ्याचे सरपंच व ग्रामसेवक यांनी कळविलेचा लेखी खुलासा दिला आहे.
सदरची अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असल्याने तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना आदेश दिले परंतु या आदेशाच्या विरोधात सरपंच व ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी व तहशिलदार यांना अतिक्रमणे हटविण्याबाबत पत्र दिल्याचा खुलासा केल्याने नेमके कोण कोणाला आदेश देत आहे , असा सवाल रेडणी ग्रामस्थांना पडला आहे