लोकमान्य मल्टी परपज को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बेळगाव यांच्या सर्व मालमत्ता ( प्रॉपर्टी ) जप्त करण्यात आल्या असल्याची सूचना 17 जुलै 20 रोजी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केली आहे (नोटीफिकेशन RD 41 GRC 2019,)
कर्नाटक सरकारने बेळगांव जिल्ह्यातील ठेवीदारांच्या ठेवी परत न केल्याच्या ठेवीदारांच्या तक्रारींची दखल घेऊन तसेच सदर सोसायटी ही बऱ्याच नियम बाह्य गोष्टी करत असल्यामुळे त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जारी केले आहेत आणि तशी सूचना वर्तमानपत्रात जाहीररीत्या प्रसिद्ध केली आहे.
महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील या संस्थेतील गुंतवणूकदारांनी काळजी घ्यावी म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने सदर नोटिफिकेशनचे वर्तमानपत्रातील कात्रण दिले आहे. आपल्या येथील वर्तमानपत्रांनी तसेच प्रमुख टीव्ही वाहिन्यांनी ही सदर माहिती देऊन ग्राहकांचे हिताचे रक्षण केले पाहिजे होते. पण जाहिरातीच्या मोहापाई, राज्यातील स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी याकडे कानाडोळा केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे सर्व ठेवीदार ग्राहकांची फसवणूक टळावी आणि त्यांचे कष्टाचे पैसे बुडू नये म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत सर्व ग्रहक वर्गास सावधान करत आहे.