(ग्रामीण भागात झाली ऑनलाईन मिटींग )
बारामती प्रतिनिधी: विनोद गोलांडे
कधी काळी ॲन्ड्रॉइड फोन वापरता न येणाऱ्या महिला एकत्र येतात ,बचत गट स्थापन करतात. मोबाईल बॅंकींग शिकु लागतात ,मोबाईल द्वारे कधी स्वत: तर कधी पतीच्या मदतीने प्रतिमाह येणारे हप्ते भरु लागतात ,आणी बघता बघता आपल्या प्रापंचीक कामातुन वेळ काढत ऑनलाईन मिटींग ही घेतात. नकळत त्यांचा बचत गट एकमेकींच्या गरजा पुर्ण करीत कधी हायटेक होतो ते ही कळत नाही .
बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील आजी माजी सैनिक स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा अमरजा आळंदीकर यांना बचत गटाचा वार्षीक आढावा व महिलाना हिशेब व आपण केलेले वर्षभरातील कामकाज सांगायचे होते त्यानी सचीव वृषाली विकास गायकवाड यांच्यापुढे विचार मांडला आणी सुरु झाली ऑनलाईन बैठकीची तयारी .झुम वर ऑनलाईन बैठक घ्यायची ठरली त्याप्रमाणे सौ आळंदीकर यानी लिंक व पासवर्ड तयार करुन पाठवला मात्र अनेक महिलाना अडचणी व शंका येवु लागल्या . मग त्वरीत गुगल मेट वर जावुन त्यानी लिंक करुन सर्व महिलाना पाठवली बचत गटातील ८० टक्के महिला सहभागी झाल्या व ऑनलाईन मिटींग सुरु झाली.अध्यक्षा सौ अमरजा आळंदीकर यानी लेखा जोखा मांडला व कोरोनाच्या पार्श्वभूमी वर एकत्र येणे धोक्याचे असुन आपण सर्वच व्यवहार जसे हप्ता भरणे ,पैसे खात्यावर हस्तांतरीत करणे असे करु शकतो तर मिटींग का नाही म्हणुन ऑनलाईन मिटींग घेतल्याचे सांगीतले .सुमारे साडेपाच लाखाचे वाटप असुन महिना दोन हजार रक्कम भरली जाते . बचत गट सदस्या सौ कल्पना रिठे यानी कोरोनामुळे शाळा बंद असल्याने आपला वह्या पुस्तकाचा व्यवसाय बंद होता किराणा सारखा व्यवसाय कधी बंद पडणार नाही म्हणुन आपण बचत गटाचे एक लाख कर्ज काढुन व्यवसाय सुरु केला खऱ्या अर्थाने संकटकाळी हा गट उपयोगी पडला असे मत व्यक्त केले .
सौ.अमरजा आळंदीकर यानी आपल्या बचत गटाच्या वाटचालीत सर्व बचत गटांच्या समन्वय समिती सदस्य अनिल शिंदे ,बाळासाहेब शेंडकर ,गणेश आळंदीकर व जगन्नाथ लकडे आदींची मदत होत असल्याचे सांगीतले .
कोरोनामुळे जरी अनेक संकट उभी राहीली असली तरी काही सकारात्मक बाबी घडु लागल्या आहेत त्यापैकी च महिला सक्षमीकरणाकडे जात असल्याचे चित्र या ऑनलाईन मिटींग ने दिसुन आले .सौ. वर्षा शिंदे ,श्रीकांत शेंडकर ई नी ही बचत गटाच्या कामाबद्दल माहीती दिली . कोरोनामुळे जगात वाताहत झाली आहे मात्र काही सकारात्मक बाबी देखील पुढे येत आहेत .यापैकीच एक बाब निदर्शनास आली ती म्हणजे नुकतीच महिलानी त्यांच्या बचत गटाची घेतलेली “ऑनलाईन मिटींग”.
अधिक वृत्त असे कि करंजेपुल,वाघळवाडी व तालुक्याच्या ग्रामीण भागात सैनिक संघटनांचे सात बचत गट आहेत .येथे “आजी माजी सैनिक स्वयंसहायता महिला बचत गट आहे हा गट मागील सव्वा वर्षापासून कार्यरत आहे .