उपक्रमात विद्यार्थिंनींबरोबर पालकांचा उत्स्फुर्त सहभाग.
महाराष्ट्र न्यूज मलकापूर प्रतिनिधी :
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे कन्याशाळा मलकापूर येथे भारताचे माजी राष्ट्रपती कै. डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ यांच्या मार्गदर्शनानुसार गुगल मीटच्या साह्याने एकाच वेळी सर्वांना ऑनलाईन घेऊन विद्यार्थिंनींना त्यांच्या आवडीचे पुस्तक एक तास वाचून घेण्यात आले.
यावेळी शाळेचे पर्यवेक्षक सुरेश राजे यांनी स्वामी विवेकानंद यांचा जीवनपट सारांश रूपाने विद्यार्थिंनींना सांगितला. मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे यांनी वाचनाची सवय या दिवसापुरतीच मर्यादित न राहता विद्यार्थीदशेतच अखंडपणे अंगिकारावी असे सांगितले.तसेच युवक वाचतील तर देश वाचेल हा ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा विचार सतत तेवत ठेवा हीच त्यांना आदरांजली ठरेल असे मत यावेळी व्यक्त केले.
सदर उपक्रमाचे आयोजन शाळेच्या ग्रंथालय प्रमुख शिक्षीका सौ.करुणा शिर्के,सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. जयश्री पाटील यांनी केले. उपक्रमात शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व पालक यांचा सहभाग होता.सदर उपक्रमात विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही सहभागी करून घेऊन वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.