महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी गणेश पवार :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सातारा जिल्ह्यासह संपूर्ण फलटण तालुक्यात थैमान घातले असून जिल्ह्यात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिनांक २५ते १ जून दरम्यान कडक निर्बंध लावण्याचे निर्देश दिलेले असून तसेच फलटण तालुका व शहर सुद्धा दिनांक २५ मे पासून संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचे निर्देश फलटणचे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी दिले असून यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनात भाजीपाला मिळण्याची अडचण होणार असून या सर्व बाबींचा पुरवठा पुढील पाच दिवस बंद राहणार असल्याने लोकांची गैरसोय होऊ नये या सामाजिक भावनेतून साखरवाडी येथील माजी सरपंच विक्रमसिंह पांडुरंग भोसले यांच्याकडून साखरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे पाचशे कुटुंबियांना टोमॅटो, वांगी, लसून, कांदा, दोडका, हिरवी मिरची, आले, बटाटे,भेंडी इत्यादी भाजीपाल्याचे घरपोच कोरोना संक्रमणाचे शासनाचे सर्व नियम पाळून दिले.