महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / साखरवाडी : गणेश पवार
स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुका यांच्यावतीने साखरवाडीच्या श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांच्या अध्यक्षतेखाली मागील थकीत ऊस बिल मिळण्यासंदर्भात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले न्यू फलटण शुगर वर्क्स लिमिटेड साखरवाडी या कारखान्यास सन २०१७/ १८ गळीत हंगामात माळशिरस तालुक्यातील मौजे कन्हेर गिरवी व इतर गावातील शेतकऱ्यांचे एफआरपीप्रमाणे थकीत ऊस बिल आहे. तरी मागील एक वर्षापासून कारखाना प्रशासनाकडे वारंवार ऊस बिलाची मागणी करून सुद्धा सदर शेतकऱ्यांना ऊस बिले मिळाले नाहीत.
यामुळे येथील शेतकरी बऱ्याच आर्थिक विवंचनेत अडकला आहे. म्हणून माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांना लेखी अर्ज करून यामध्ये मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. त्यामुळे आज सकाळी ११ वाजता कारखान्याच्या मुख्य गेट समोर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कारखाना प्रशासनाने दसऱ्याच्या अगोदर पूर्ण ऊस बिले देऊ असे आश्वासन दिले. यावेळी धनंजय महामुलकर जिल्हाध्यक्ष सातारा स्वाभिमानी शेतकरी संघटना नितीन यादव तालुकाध्यक्ष सचिन खानविलकर शहराध्यक्ष प्रमोद गाडे युवा अध्यक्ष, दादा जाधव युवा उपाध्यक्ष व माळशिरस तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
“कारखाना प्रशासनाने दिलेला शब्द पाळून दसऱ्याच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांची करावीत अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करणार : धनंजय महामुलकर जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना