महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :20 एप्रिल रोजी रेल रोकोरेल्वे चे दुर्लक्ष, ग्रामस्थ आक्रमकभूयारी पुल प्रश्नी रेल रोकोरेल्वे प्रशासनाने दहा एप्रिल पूर्वी पार्ले येथील गेट नंम्बर 98 च्या भूयारी पुलाचे काम सुरु करण्याचे लेखी पत्र सचिन नलवड़े यांना दिले होते परंतु अद्यापही रेल्वे प्रशासनाने भूयारी मार्गाचे काम सुरु न केल्याने पार्ले,वडोली निलेश्वर, कोपर्डे हवेली ग्रामस्थानच्या वतीने कराड रेल्वे स्टेशन येथे गुरुवार 20 एप्रिल रोजी रेल रोको करणार असल्याचे निवेदन रयत क्रांती चे सचिन नलवड़े यांनी रेल प्रबंधक पुणे यांना ईमेल द्वारे कळवले आहे.गेले चार महिने रेल्वे प्रशासनाच्या ढीसाळ कारभारचा फटका पार्ले, वडोली निलेश्वर,कोपर्डे हवेली येथील नागरिकांना बसत आहे वडोली निलेश्वर व उत्तर पार्ले येथे जान्यासाठी रेल्वे क्रोसिंग करणे एवढा एकच मार्ग आहे त्यामुळे येथे राहणाऱ्या महिला,शाळा कॉलेज ला जाणारी मुले मूली यांना तीन ते चार किलोमीटर पायपिट करावी लागत आहे। रात्री च्या वेळी ये जा करताना हा रस्ता निर्मानुष्य असल्याने महिला वर्ग भीतिच्या छायेखाली आहे गेल्या आठवड़ा झालेल्या वादळी पाऊसाने रेल्वे शेजारील पानंद रस्ता चिखल झाल्याणे बंद झाला होता त्यावेळी नागरिकांना सह्याद्री कारखाना,शहापूर, वडोली मार्गे आठ दहा किमी वरुण उत्तर पार्ले येथे यावे लागत होते।पावसाळ्या पूर्वी बोगदयाचे काम पूर्ण झाले नाहीतर येथील नागरिकांचे आतोनात हाल होणार आहेत सचिन नलवड़ेरेल्वे प्रशासनाने जर विस् तारखेपूर्वी काम सुरु केले नाहीतर तिन्ही गावचे नागरिक आक्रमक पवित्रा घेणार असून रेल रोको करणार आहेत, नागरिकांच्या भावनेचा उद्रेक होण्याची वाट रेल्वे प्रशासनाने पाहू नये