सातारा : महाराष्ट्रातील आघाडी, तिघाडी सरकार हे महिलांवर होणारे अत्याचार नुसतेच डोळे विस्फारून पहात आहे, परंतु गुन्हेगारांवर कारवाई करताना घाबरत आहे, याचा निषेध करण्यासाठी साताऱ्यातील पोवई नाका येथे, भा ज पा महिला मोर्च्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णाताई पाटील आणि महिला मोर्च्या सातारा जिल्हाध्यक्षा डॉ. सुरभी भोसले यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.
संकटास घाबरून घरात बसलेल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार सुरु आहेत. सरकारच्या दबावामुळे गुन्हेगारांवर कारवाई करण्याची पोलिसांची हिंमत राहिलेली नाही.



















