दिनांक 10/06/2022रोजी सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा या ठिकाणी सहाय्यक पोलिस अधिक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा पोलीस दलाचे निर्भया पथकाने विद्यार्थीनीना मार्गदर्शन करताना सांगितले की मुलीनी मनात कोणतेही दडपण न ठेवता संकटाला सामोरे जावे व छेडछाड यांसारखे प्रकार होत असतील तर आपली तक्रार पोलिसांकडे द्यावी, वेळेत या तक्रारी दाखल झाल्यानंतर पुढील अनुचित घटना टाळता येतील निर्भया बाबत सविस्तर माहिती देऊन ,महिला सुरक्षा, छेडछाड बाबत कलमान्वये माहिती दिली.सदर कार्यक्रमात विदयार्थ्यांना स्वसंरक्षणाबाबत ची माहिती देऊन मोबाईल फोनचा वापर करताना कश्या प्रकारे काळजी घ्यावी तसेच डायल 112 बाबत माहिती दिली त्याच प्रमाणे काही अडचण असल्यास संपर्क साधनेस सांगितले व लेखी तक्रारी अर्ज देणेबाबत सांगितले.
व महाविद्यालयांमध्ये महिलांच्या तक्रारी करीता निर्भयाची स्वतंत्र तक्रार पेटी असावी, त्याच प्रमाणे सायबर क्राईम बाबत सविस्तर माहिती दिली तसेच मोबाईलचा अतिवापर घातक ठरत आहे विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे अरविंद गवळी कॉलेज चे प्रिन्सिपल विलास फरांदे म्हणाले, मुलींनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शिक्षण घेतल्यास सर्व काही शक्य आहे मुलींनी संकटाला सामोरे जाऊन वेळीच निर्भया पथकाकडे तक्रार करून त्यांचे निरसन करावे तसेच निर्भया पथकाचे मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी पोलीस कॉन्स्टेबल बर्गे तसेच निर्भया पथकाच्या महिला पोलीस अंमलदार काजल राठवडे मॅडम , पो कॉ.अजित माने , शिक्षकवर्ग प्रो.अभय काळे सर,सूत्रसंचालन -अमृता चव्हाण ,आयोजक अश्विनी सावंत मॅडम ,आभार प्रदर्शन- प्रो.रजनी मांढरे मॅडम हे सर्व उपस्थिती होते .