महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :वाई
कोविडच्या आलेल्या अस्मानी संकटाचा सामना करण्यासाठी आशासेविका आरोग्यदुत बनत आपला जीव धोक्यात घालुन समाजाची सेवा अल्पशा मानधनावर करीत आहेत. या आशासेविकांच्या मानधनवाढीसाठी आपण शासनस्तरावर प्रयत्न करून त्यांच्या कष्टाला न्याय देणार असल्याचे प्रतिपादन, भाजपाच्या जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ. सौ. सुरभि भोसले-चव्हाण यांनी केले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भुईंज येथील आशा सेविकासौ. मंगला जाधव, सौ. अनिसा मोमीन, सौ. सुजाता खरे, सौ. शुभांगी धुरगुडे, सौ. संगिता दगडे,सौ. अनुपा एरंडे या आशासेविकांना सोशल डिस्टींनीगचे पालन करीत ऑक्सीमीटर, सॅनिटायझर,माधवरसायन वटी या किटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. देश कोरोनासारख्या भयंकर रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्वस्तरातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत.
या भीषण परिस्थितीत आशाताईंनी आपला जीव धोक्यात घालून शासनाने दिलेल्या कामाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत कोविड विरूद्धच्या लढाईत आघाडीवर आहेत. त्यांच्यावर कामाचा असणारा ताण व त्याबदल्यात मिळणारे अल्पशे मानधन यात मोठी तफावत आहे. त्यांच्या श्रमाला योग्य तो दाम मिळालाच पाहीजे, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातुन प्रयत्न करणार असल्याचे सौ. सुरभि भोसले-चव्हाण यांनी सांगितले. यापुर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरूपात आशाताईना गुड्ची टॅबलेट, सॅनिटायझर व ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात आले होते.
यावेळी भुईंजच्या सरपंच सौ. पुष्पाताई भोसले, उपसरपंच प्रशांत जाधवराव, अर्जुनराव भोसले, माजी सरपंच सौ. अनुराधा भोसले, आरोग्य सेवक राजेंद्र पांढरपट्टे, कृष्णकांत शिंदे उपस्थित होते.