महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :सोमेश्वरनगर
बारामती तालुक्यात सहा सप्टेंबर रोजी ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाली . यामध्ये ऊस पिक भुईसपाट झाले तर बाजरी व कांदा या पिकं बांधावर काढून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली . यानंतर महसूल खात्याच्यावतीने पंचनामे नोंद करण्याचे आदेश दिले . दरम्यानच्या काळात बारामती तालुका दि. ७ ते २० सप्टेंबरपर्यंत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे लॉकडाऊन करण्यात आला होता .
यामुळे बधीत शेतकऱ्यांना अर्जासोबत आधार कार्ड , बॅंक पासबुक झेरॉक्स व मुख्य म्हणजे बाधित पिकाचे फोटो देण्यामध्ये शेतकर्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या . तालुक्याच्या पश्चिम भागात केवळ मोरगांव व सुपा हे बाजार पेठेचे मुख्य गाव असल्याने मोरगाव , तरडोली , मुर्टी , आंबी , जोगवडी , मोढवे , लोणी भापकर , पळशी , मासाळवाडी या परिसरात बाधित शेतकरी कागदपत्रांची पूर्तता करु शकले नाही .
काल दि. २२ पिक नुकसान भरपाईसाठी करावयाच्या अर्जाची मुदत संपली असल्याचे घोषित केलेले आहे. मात्र अनेक शेतकरी मिळणाऱ्या संभाव्य शासकीय मदतीवाचुन वंचीत राहणार आहेत .तर मूठभर शेतकऱ्यांना याचा केवळ लाभ मिळणार आहे .यामुळे बारामती तहसीलदार यांनी नुकसान भरपाई अर्जासाठी वाढिव मुदत देण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे . तालुक्यात सहा सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली. यामध्ये ऊस , कांदा ,बाजरी अशा अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्ण व लॉक डाऊनमुळे शेकडो शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करता आली नाही.