महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (मसूर ) :
राज्यात सह्याद्री पॅटर्न म्हणून नेहमीच अग्रेसर असलेल्या कराड तालुक्यातील यशवंनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने सामाजिक बांधिलकी जोपासत आणिि शासनाच्या आवाहनाला राज्यातून प्रथम क्रमांकाचा प्रतिसाद देत 150 बेडच्या कोवीड ९० सेंटरची उभारणी केली असून येत्या दोन दिवसात हे सेंटर शासनाकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती सह्याद्रि कारखान्याचे संचालक व युवा नेते जशराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत आज दिली. साखर कारखान्यांनी कोविड सेंटरची उभारणी करावी असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले होते.
त्यानुसार कारखान्यातर्फे कोविड सेंटर उभा करण्याचा प्रयत्न जिल्ह्यात प्रथमच सह्याद्रीने राबवून कोविडच्या लढाईत सह्याद्रीचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरला आहे. सह्याद्री कारखाना कार्यस्थळावर सह्याद्री कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात या सेंटरची उभारणी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या कोवीड सेंटरच्या उभारणीच्या कामाची पाहणी राज्याचे सहकार पणन मंत्री तथा पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी केली असल्याचेही त्यांनी सांगितले
संचालक पाटील पुढे म्हणाले, कोरोना रोगाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बेडची उपलब्धता होत नाही तसेच ऑक्सिजन सुविधाही जिल्ह्यात कमी पडू लागली आहे त्यासाठीच या कोवीड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.
या सेंटरमध्ये 100 रुग्णांकरिता उपचार कक्ष तयार करण्यात आला आहे. 50 रुग्णांच्यासाठी ऑक्सिजनच्या सुविधेसह स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. सेंटरमध्ये कारखान्याकडून रुग्णांना पिण्यासाठी गरम पाणी, साबण, टूथ ब्रश वाफारा मशीन पुरवण्यात येणार आहेत. सेंटरच्या कामाची पाहणी पणन व सहकार, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली आहे. सह्याद्रीने सामाजिक बांधिलकी विचारात घेऊन शासनाच्या आवाहनानुसार सह्याद्री हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती एप्रिल मध्ये सुरू केली. ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आदींना रुपये शंभर प्रतिलिटर याप्रमाणे विक्रीची व्यवस्था केलेली आहे. आशा सेविका, पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी 2000 लिटर सनीटायझरचे मोफत वाटप करण्यात आले आहे.कारखान्याच्या गळीत हंगाम अखेरीस ऊसतोड मजूरा करिता साबण, सॅनिटायझर, जीवनावश्यक वस्तूं उपलब्ध करण्यात आल्या. हंगाम संपताच मजुरांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गावी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांना मास्क हातमोजे देण्यात आले. असे सांगून संचालक पाटील यांनी सर्वांनी मास्क, सैनीटायझरचा वापर करावा. कोरोनाला न घाबरता कणखरपणे सामोरे जावे.
अनाठायी भीती बाळगू नये. वेळेत उपचार घेऊन निश्चित बरे होता येते. सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, जनरल मॅनेजर पी आर यादव, सल्लागार एच टी देसाई ,बांधकाम अभियंता वाय जे खंडागळे, परचेस अधिकारी जे डी घार्गे,फायनान्शिअल ॲडव्हायझर जी व्ही पिसाळ, व्ही जे शेलार, आर जी तांबे, उपस्थित होते.