महाराष्ट्र न्यूज रहिमतपूर प्रतिनिधी :
पुणे विभागातील भाजपाची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्य देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी केले.
रहिमतपूर मधील वीरशैव तिराळी समाज जंगम मठात पुणे विभाग पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण गणपती लाड व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपनेते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील होते.
व्यासपीठावर राष्ट्रीय कांग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र शेलार, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील माने, महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले, रहिमतपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपनगराध्यक्ष माधुरी भोसले, कोरेगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती कांतीलाल पाटील, आदर्श सरपंच शहाजीराव क्षीरसागर, सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस धैर्यशील सुपले, शिवसेना नेते व रहिमतपुरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, माजी नगराध्यक्ष अविनाश माने, आदी मान्यवर उपस्थित होते.
नामदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, आपले नेते माननीय शरदरावजी पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पुणे विभाग पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण गणपती लाड आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक जयंत आसगावकर यांना सातारा जिल्ह्यातून विक्रमी मतांनी निवडून आणू या.
प्रा. नितिन बानगुडे पाटील म्हणाले पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवायची आणि निवडून आल्यावर पदवीधर हा शब्द सुद्धा विसरून जायचे, मागची आश्वासने विसरून पुन्हा मतं मागायची, असे राजकारण भाजप आतापर्यंत करत आले आहे. यापुढे ते चालणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून पुणे विभाग पदवीधर मतदार संघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्क्याने निवडून येतील.
यावेळी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र शेलार, शिवसेना नेते माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची समयोचित भाषणे झाली.
मेळाव्याचे सूत्रसंचालन माजी नगराध्यक्ष अविनाश माने यांनी केले, तर आभार विध्याधर बाजारे यांनी मानले.
या मेळाव्यास रहिमतपुर परिसरातील कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब निकम, कोरेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन भागवत घाडगे, आदर्श शिक्षण संस्थेचे चेअरमन नंदकुमार माने-पाटील, राहुल निकम, आनंदराव निकम, राजेंद्र घाडगे, बंडा देशमुख, राजेंद्र मोरे, सुरेश थोरात, सतीश भोसले, प्राध्यापक भानुदास भोसले, नगरसेवक विद्याधर बाजारे, दिलीप माने, शशिकांत माने, शशिकांत भोसले, शिवराज माने, रहिमतपुर आजी-माजी नगरसेवक, परिसरातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते