महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मुळगाव :
पाटण येथील विनीत काटे या विद्यार्थ्यांने जे.ई. ई. ऍडव्हान्स या परीक्षेत मोठे यश मिळविले आहे. या परीक्षेत विनीत काटे याने देशातून 1971 ही रँक मिळवली आहे.विनीत काटे याचे प्राथमिक शिक्षण हे श्रीमंत सरदार भीमराव नागोजीराव पाटणकर विद्यामंदिर पाटण व माध्यमिक शिक्षण माने देशमुख विद्यालय पाटण व सैनिक स्कुल सातारा येथे झाले.
नंतरचे शिक्षण त्याने संजय घोडावत अतिग्रे या ठिकाणी झाले. या देशभरातून जवळपास दीड लाख विद्यार्थी या परीक्षेस बसले होते त्यामध्ये त्याने ही रँक मिळवली असून ती पाटण तालुक्याच्या दृष्टिकोनातून अभिमानाची बाब आहे.

विनीत काटे याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे श्रीमंत सरदार भीमराव नागोजीराव पाटणकर विद्यामंदिर चे मुख्याध्यापक शंकर जाधव, माने देशमुख विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य विलास पवार माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर, कोयना शिक्षण संस्थेचे सदस्य याज्ञसेन पाटणकर, संजीव चव्हाण या मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले.






























