महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :(नातेपुते)
लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे व प्रदेश अध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा आणि महाविद्यालये चालू करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलने करण्यात आली. याच अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलन हे माळशिरस तहसील कार्यालयावरती करण्यात आले असून या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार श्री तुषार देशमुख साहेब यांनी स्वीकारले व तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे. संपूर्ण देशभरात सध्या अनलाॅक ची प्रक्रिया चालू असताना वेगवेगळी ठिकाणे कार्यालये मंदिरे मॉल इत्यादींना चालू करण्यास परवानगी नियम व अटींच्या साहाय्याने सरकारने परवानगी दिली आहे. त्याच पद्धतीने देशाचे भवितव्य असलेले विध्यार्थी यांचे शालेय नुकसान होऊ नये या साठी शाळा आणि महाविद्यालये चालू करावीत व लोकशाहीर डाॅ आण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा. या मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर सोलापूर जिल्हा अध्यक्ष महादेव तुपसौंदर,माजी जि .प सदस्य व सोलापूर जिल्हा कोर कमिटी अध्यक्ष बाळासाहेब सपताळे,जिल्हा सरचिटणीस जयवंत सपकाळ, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ खिलारे, तालुका कार्याध्यक्ष राहुल रणदिवे, तालुका उपाध्यक्ष नंदू लांडगे, अजित खुडे, गणेश खिलारे,बबलू लांडगे,सनी खिलारे, शाम बाबर तसेच आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.