कराडमध्ये 1 मे रोजी महाराष्ट्रदिनी ‘वॉकेथॉन’.‘इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेलॉजिस्ट’तर्फे आयोजन डॉ. अतुल भोसले प्रमुख उपस्थिती.
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेलॉजिस्ट’च्या कराड शाखेच्यावतीने रविवारी (ता. १) महाराष्ट्र दिनानिमित्त प्रीतिसंगम घाटावर सकाळी ६ वाजता ‘वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
वैद्यकीय क्षेत्रात भूलतज्ज्ञांचे असलेले महत्व अधोरेखित व्हावे, तसेच उत्तम आरोग्यासाठी नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी या ‘वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘प्रत्येक नागरिक एक जीवन रक्षक’ या उपक्रमाअंतर्गत अचानक हृदयक्रिया बंद पडल्यास वैद्यकीय मदत उपलब्ध होईपर्यंत करावयाचे Compression only life support (COLS) म्हणजेच जीवनसंजीवनी क्रिया याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक यावेळी दिले जाणार आहे. या वॉकेथॉनमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेलॉजिस्ट’च्या कराड शाखेचे अध्यक्ष डॉ. रमाकांत मोहिते व सचिव डॉ. श्रद्धा नाईक-बहुलेकर यांनी केले आहे.