महाराष्ट्र न्युज वाई तालुका प्रतिनिधी………..
दिनांक ०७/०१/२०२२ रोजी मिळालेल्या माहिती नुसार मौजे ओझर्डे गांवचे हददीतील ओझर्डे ते सोनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेतवस्तीवरील पत्र्याचे शेडमध्ये वनपरिक्षेत्र वाई कडील अधिकारी कर्मचारी यांनी अचानक धाड टाकली असता भरत सुरेश जाधव वय, महेश अशोक साळुंखे, गणेश अर्जुन कारंडे, सोमनाथ काळू पवार, नितीन अरुण गायकवाड, मनोज नारायण घोरपडे सर्व राहणार ओझर्डे ता. वाई जि. सातारा हे साळींदर वन्यप्राण्याचे मांस जर्मलच्या पातेल्यामध्ये शिजवून पार्टी करीत असल्याचे मिळून आले. पंचनामा करुन मुददेमाल जप्त करतेवेळी मनोज नारायण घोरपडे हा अंधाराचा फायदा घेवून पसार झाला. वन्यजीव (सरंक्षण) अधिनियम, १९७२ चे कलम ९, ३९, ५०, ५१ चे उल्लंघन झाल्याने वनरक्षक बोपेगांव यांचेकडील प्र.गु.रि.नं१/२०२२ दिनांक ०७.०१.२०२२ अन्वये वनगुन्हा नोंद केला आहे. वरील सर्वांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचे साळींदर वन्यप्राण्याचे मांस हे दिपक ज्ञानेश्वर चव्हाण रा. कणूर ता. वाई जि. सातारा यांनी आणून दिल्याचे जबाबा द्वारे कबूल केले आहे. सदर आरोपींना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास चालू आहे. सदरची कारवाई मा. उपवनसंरक्षक सातारा महादेव मोहिते, मा. सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) सातारा सुधिर सोनवले, यांचे मार्गदर्शनाखाली वाईच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल मगर, वनपाल भुईज संग्राम मोरे, वनपाल वाई सुरेश पटकारे, वनरक्षक वाई वैभव शिंदे, वनरक्षक जांभळी संदिप पवार, वनरक्षक वडवली रामेश्वर भोपळे यांनी केली.