सातारा : कोणत्याही भागाचा विकास करायचा असेल तर प्रथम त्या भागातील खेड्यापाड्यापर्यंत डांबरी रस्ता पोहचला पाहिजे. हेच सुत्र ओळखून सातारा- जावली मतदारसंघात वाड्यावस्त्यांसह प्रत्येक गावात डांबरी रस्ता पोहचवणार्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून जावली तालुक्यातील ९ रस्त्यांची दर्जोन्नती झाली आहे. दर्जोन्नती झाल्याने प्रमुख जिल्हा मार्ग बनलेल्या या ९ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून तब्बल २ कोटी ९६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून लवकरच या ९ रस्त्यांची दुरुस्ती होवून हे रस्ते वाहतूकीसाठी चकाचक होणार आहेत.
रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू नये आणि रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती व्हावी यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुचनेनुसार जावली तालुक्यातील ९ रस्ते जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले. या ९ रस्त्यांची दर्जोन्नती होवून प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून गणल्या गेलेल्या या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या द्विवार्षीक देखभाल दुरुस्ती कार्यक‘मांतर्गत आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून २ कोटी ९६ हजार रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. या निधीतून महु, पिंपळी, खर्शी, वालूथ, हुमगाव, इंदवली, दरे, करंदोशी या प्रमुख जिल्हा मार्गाच्या (०/०० ते १९/०० किमी)दुरुस्तीसाठी २३.६१ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे.
प्रजिमा २६ ते कास, एकीव, गाळदेव, माचुतर ०/०० ते १७/५०० किमी या भागातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २१.४५ लाख तर याच रस्त्यावरील १७/०० ते ३३/५०० किमी या भागाच्या दुरुस्तीसाठी २०.६५ लाख रुपये निधी मिळाला आहे. प्रजिमा २६ ते गोगवे, वरसोळी, गाळदेव, वाघदरे, म्हाते, मोहाट, गांजे, तांबी, खरोशी, निझरे, कामथी, वेळे ते कण्हेर या रस्त्याच्या (०/०० ते २१/५०० किमी) दुरुस्तीसाठी २७.९५ लाख रुपये, दिवदेव, मार्ली, भालेघर, आखाडे जोड रस्ता प्रजिमा १४२ (०/०० ते १०/०० किमी) दुरुस्तीसाठी १२.५० लाख, आशियाई महामार्ग क‘. ४७ (राष्ट्रीय महामार्ग क‘. ४) ते आनेवाडी, सायगाव, मोरघर, वाघेश्वर ०/०० ते १४/०० किमी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १७.३५ लाख, मेढा (वेण्णा चौक), कुसुंबी, सह्याद्रीनगर, कोळघर फाटा , अंधारी, मुनावळे, वाघळी, शेंबडी, बामणोली रस्ता ०/०० ते २७/३०० किमी दुरुस्तीसाठी ३३.९० लाख, राज्य मार्ग १४० ते आंबेघर फाटा , पुनवडी, केडांबे, बोंडारवाडी रस्ता ०/०० ते १३/०० किमी दुरुस्तीसाठी १६.८० लाख, आणि भिलार, उंबरी, धावली, आलेवाडी खिंड, रेंगडी मुरा, कुंभारगणी, मोरखिंड, जननी माता मंदीर, मोरावळे ते राज्य मार्ग १४० या रस्त्याच्या (८/०० ते २७/०० किमी) दुरुस्तीसाठी २६.७५ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे.
तातडीने निविदा प्रक्रिया राबवून लवकरात लवकर रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरु करा आणि कामे दर्जेदार करुन वेळेत पुर्ण करा, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना केल्या आहेत.