महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / बारामती :
बारामती तालुक्यातील पश्चिम भाग हा ऊस पिकासाठी प्रसिद्ध असून या भागात फार मोठे ऊस बागायत प्रगतशील शेतकरी आहेत. येथील शेतकऱ्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून अनेक शेतकरी आपल्या शेतीमध्ये ऊस, टोमॅटो, बाजरी, सोयाबीन अशी वेगवेगळी पिके घेतात अंतर्गत पिकांमध्ये कोबी, फ्लॉवर, गवार, भेंडी अशी पिके घेतली जातात तसेच मुरूम गावातील प्रगतशील शेतकरी प्रशांत दत्तात्रय कोरडे यांनी आपल्या शेतीव्यवसायात आतापर्यंत वेगवेगळे प्रयोग केले आहेत.त्यांनी गत वर्षी दोन एकर मध्ये कलिंगड, खरबूज या पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.
प्रशांत दत्तात्रय कोरडे यांनी आपल्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करतात गेल्या वर्षी कोविड च्या काळात देखील त्यांनी कलिंगड खरबूज कांदा अशी पिकांची लागवड केली होती व त्यामध्ये उत्पादनदेखील खूप मोठ्या प्रमाणात झाले होते त्यामधून निघणाऱ्या कलिंगड, खरबूज, कांदे याची विक्री त्यांनी घरोघरी जाऊन केली व त्यामध्ये त्यांना यश आले. त्यांनी नुकतेच दोन एकर क्षेत्रामध्ये कलिंगड व खरबूज या पिकाची लागवड केली असून त्यांनी बेडवर मल्चिंग पेपरचा वापर केलेला आहे. कलिंगड लागवड करण्यास सुरुवात झालेली आहे हा प्लॉट पाहण्यासाठी अनेक शेतकरी तसेच ग्रामस्थ त्यांच्या शेतात गेल्या वर्षी आले होते त्याच बरोबर या वर्षी देखील येत आहे, अशी माहिती प्रगतशील शेतकरी प्रशांत दत्तात्रय कोरडे यांनी दिली.