बारामती ता.२४-: शिवजयंतीचे औचित्य साधून वाघळवाडी येथे वाघळवाडी स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने कब्बडी स्पर्धेचे आयोजन….
सुनिल निंबाळकर/ बारामती प्रतिनिधी
उत्कर्ष आश्रम शाळा येथे पार पडलेल्या स्पर्धेत २८ संघांनी सहभाग घेतला होता. चुरशीचा झालेल्या सामन्यात ११ हजार रुपये आणि चषक असे प्रथम पारितोषिक विजयी महाराणा प्रताप कळंब, द्वितीय पारितोषिक ८ हजार रुपये आणि चषक विजयी बारामती स्पोर्ट्स क्लब बारामती, तर तृतीय पारितोषिक ५ हजार रुपये आणि चषक विजयी नवतरूण क्रिडा मंडळ सासवड आणि विकास सावंत मित्र मंडळ वाघळवाडी यांना विभागून देण्यात आले.
या झालेल्या स्पर्धेचे उदघाटनावेळी कृषी औद्योगिक सेवा संघाचे उपाध्यक्ष गौतम काकडे, वाघळवाडीचे उपसरपंच जितेंद्र सकुंडे, समर्थ ज्ञानपीठचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, पी.एम.गायकवाड,डी. व्ही.जगताप, प्रविण सकुंडे, युवा नेतृत्व अमित शिंदे ,मुरुमचे माजी उपसरपंच निलेश शिंदे, तुषार सकुंडे, संदीप भिलारे,संतोष निकम, अभिजित पवार, सुजित सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
महिलांच्या मध्ये वाघळवाडी स्पोर्ट अकॅडमी, उत्कर्ष आश्रम शाळा वाघळवाडी,युनिक अकॅडमी वाघळवाडी यांच्या मध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यात वाघळवाडी स्पोर्ट अकॅडमी दोन्ही संघावर मात करत विजय मिळविला.
या स्पर्धेसाठी खेळाडूसाठी अक्षय गायकवाड यांनी भोजन व्यवस्था, प्रदिप मांगडे यांनी मंडप व्यवस्था तर कृष्णाई इलेक्ट्रिकल यांनी लाईट व्यवस्था केली होती.
या स्पर्धेचे आयोजन उपसरपंच जितेंद्र सकुंडे यांनी केले होते. स्पर्धेचे संयोजन ओंकार जाधव, गौरव ताटे, प्रशांत हंगिरे, संभाजी केंगार यांनी केले.