योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन : रमाकांत डाके
कराड : कोविड-19 या संसर्ग आजारपणामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल अथवा विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध व्हावा याकरिता राबविण्यात येणाऱ्या मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कराड नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत नाव नोंदणी अभियान सुरु केलेले आहे.
मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शासकीय विविध योजनांचा लाभ उपलब्ध व्हावा याकरिता राबविण्यात येणाऱ्या मिशन वात्सल्य योजने अंतर्गत कुंटूब निवृत्तीवेतन योजना, बाल संगोपन योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना अशा विविध योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या योजनेचा अधिकाधिक प्रचार प्रसार करावा तसेच नाव नोंदणी आपल्या वार्डातील अंगणवाडी सेविका यांच्याकडेही करता येईल. तसेच सविस्तर माहितीसाठी कराड नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे.