महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी गणेश पवार :
लक्ष्मीनगर फलटण येथे एक जनाला हनी ट्रपमध्ये अडकवून २०लाख रुपयांची मागणी केली व त्यातील सुमारे १५लाख ५०हजार रुपये फिर्यादीने आरोपीस दिले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून पीडित फिर्यादीने फलटण शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून तिथून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दि १५ मे रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास पिडीत फिर्यादी हे त्यांच्या भाडयाचे गाळयात बसलेले असताना अजीत घोलप (रा नागेश्वर नगर चौधरवाडी) याने मानस प्लाझा बिल्डींग लक्ष्मीनगर फलटण येथे भेंडीचा व्यापारी आलेला आहे ते भेंडी घेणार आहे असे सांगून त्यांचे स्कुटी मोटार सायकलवरून घेवून गेला व त्यावेळी तेथे एक मुलगी, राजू बोके, मनोज टिप्परकर, रोहीत भंडलकर हे देखिल बसलेले होते त्यांनी फिर्यादी यांना मारहाण करून त्यांची कपडे काढून सदर मुलीचे अंगावर ढकलून देवून फोटो काढले व तेथून गिरवीकडे जाणाऱ्या रोडवरील ओढयात अजित घोलप व विजय गिरी गोसावी यांनी जबरदस्तीने पिवळे रंगाच्या स्कुटी मोटार सायकल वर मध्ये बसवून घेवून गेले व तेथे राजू बोके , मनोज हिप्परकर , रोहीत भंडलकर ,हे देखिल त्यांचे स्कुटी मोटार सायकल वरून तेथे आले व त्या सर्वानी फिर्यादी यांना हाताने लाधाबुक्यांनी मारहाण , दमदाटी केली व रोहीत भंडलकर याने फिर्यादी यांचे तोंडात लघवी केली त्यावेळी बाकीचे लोकांनी त्यांना धरून ठेवले व म्हणाले की ‘आत्ता पोलीस स्टेशनला घेवून जातो व त्या मुलीला तुझ्या विरुध्द बलात्काराची तक्रार देण्यास सांगतो’ असे करायचे नसेल तर २० लाख रुपये द्यावे लागतील .
फिर्यादीने स्वतःची इज्जत जाईल बदनामी होईल या भितीने आजपर्यंत त्यांना १५ लाख ५० हजार रूपये दिलेल्ने आहेत . आज रोजी पिडीत फिर्यादी यांना पोलीसांनी सुरक्षिततेची ग्वाही दिल्याने त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.त्यानुसार भा द वि कलम ३६४ ( अ ) ३८४,३८६.३८ ९ , ३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गुन्हयाचा तपास पो उपनि बनकर करीत आहेत
फलटण शहर पोलीस ठाणेचे वतीने जाहीर आवाहन करण्यात येते कि ,जर अशा प्रकारची घटना कोणा बरोबर घडली असल्यास त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा त्यांचे नांव गोपनीय ठेवण्यात येईल .
बी .के. किंद्रे
पोलीस निरीक्षक फलटण शहर