महाराष्ट्र न्यूज इम्पॅक्ट
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/ कराड : महाराष्ट्र न्यूज च्या बातमीचा दणक्यामुळे कराड नगरपरिषदेला जाग आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरत घाणीचे साम्राज्य झालेली बातमी जेव्हा महाराष्ट्र न्यूज प्रसिद्ध केली त्यानंतर त्या बातमीचे पडसाद दिसून आले व कराड नगरपरिषदेने त्वरित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर साफसफाई करण्याचे काम हाती घेतले व आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर साफ करण्याची तयारी चालू आहे तरी पण मागासवर्गीय फंडातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराची डागडुजी करण्यासाठी नागरिकांमधून वारंवार कराड नगरपालिकेला मागणी केली जात तरी कराड नगरपरिषद गांभीर्याने विचार करताना दिसत नाहीये.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराची डागडुजी कधी होणार? असे प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहेत.






























