बारामती प्रतिनिधी विनोद गोलांडे
ईंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन च्या महाराष्ट्र समन्वयक पदी किरण आळंदीकर व विजय लष्करे””( बारामती च्या शिरपेचात मानाचा मुकुट) “
IBJA इंडिया बुलियन ज्वेलरी असोसिएशन च्या महाराष्ट्र” समन्वयक ” पदी बारामती चे किरण आळंदीकर व (वाई ) सातारा चे विजय लष्करे यांची निवड.
_ IBJA ( इंडिया बुलिअन ज्वेलर्स असोसिएशन ) हि राष्ट्रीय पातळीवरील 101 वर्षांपूर्वीची जुनी व सर्वोच्च असोसिएशन असुन संपूर्ण जगाची ओळख असणारी शिखर संस्था आहे. भारतातील सर्व राज्यात हि संस्था कार्यरत आहे, भारतातील सोन्याचे दर ठरवण्यामधे महत्वपूर्ण भुमीका या संस्थेची असते, त्याप्रमाणे भारतीय रिझर्व बँक ,भारत सरकार मध्ये तेच सोन्याचे दर अधिकृत म्हणून ग्राह्य धरले जातात.या संस्थेचे असून सोने – चांदी क्षेत्रातील भारतातील ही शिखर संस्था मानली जाते. या मध्ये किरण आळंदीकर ( बारामती ) विजय लष्करे ( वाई ) यांची महाराष्ट्र राज्यासाठी ” समन्वयक ( Coordinator ) म्हणून या संस्थेने निवड करून राष्ट्रीय पातळीवर संपूर्ण महाराष्ट्राची सूत्रे सोपवली असून महाराष्ट्रातील सदस्य ,पदाधिकारी नेमणुकीचे अधिकार या दोघांना प्राप्त झाले आहेत.किरण आळंदीकर हे बारामती सराफ असोसिएशन चे अध्यक्ष, आणि महाराष्ट्र सराफ सुवर्णकार फेडरेशन चे वरीष्ठ उपाध्यक्ष आहेत,विजय लष्करे वाई सराफ असोसिएशन चे अध्यक्ष आणि महाराष्ट्र सराफ सुवर्णकार फेडरेशन चे उपाध्यक्ष आहेत ,दोघांचे संघटन कौशल्य मजबूत असून,या क्षेत्रातील अभ्यास, कार्य देखील उल्लेखनीय आहे..याची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांच्या अनुमतीने राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी त्यांच्या स्वाक्षरीने नुकतेच दोघांना नियुक्ती चे पत्र दिले .दोघांच्या निवडी नंतर IBJA चे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता, मध्य भारताचे प्रमुख अविश सराफ, उत्तर भारत प्रमुख अनुराग रस्तोगी, महाराष्ट्राचे संचालक चेतन राजपुरकर,संचालक भैय्या भाऊ भामरे, राज्यातील सर्व सराफ असोसिएशन चे पदाधिकारी, ,बारामती ऍग्रो चे चेअरमन राजेंद्र पवार, यांचे सह सामाजिक ,राजकीय, पत्रकारिता क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या दोघांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.देशाला कोट्यावधी चा कर प्रतिदिन सराफ व बुलियन व्यवसायातुन दिला जातो. सराफ,सुवर्णकाराना जाचक ठरणारा एक्साईज कायदा रद्द करणेसाठी बारामती चे मोठे योगदान होते. दिल्लीमधे अर्थमंत्रालयाच्या बैठकीत देखील आळंदीकर व लष्करे यांचा महत्वपूर्ण सहभाग होता.