फलटण : प्राणी संरक्षण सुधारित अधिनियम 1995 अंतर्गत अवैधरित्या गाई व लहान खोंडे कत्तलीसाठी घेऊन जात असताना जप्त करू तिघांना अटक केल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली आहे.
दिलेल्या माहितीनुसार, 14 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन च्या सुमारास सस्तेवाडी ता. फलटण गावच्या हद्दीत एका पिकअपमध्ये काही जनावरे दाटीवाटीने घेऊन कत्तलीसाठी जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सदर पिकपवाहन आणि जनावरे जप्त केली आहेत. यामध्ये 3 जर्सी गाई ,किंमत अंदाजे सोळा लाख रुपये व 68 जर्सी जातीची लहान खोंडे यांचा समावेश आहे. सदर जनावरे अवैधरित्या कत्तल करण्यासाठी नेणे आणि त्यांची खाण्या-पिण्याची कोणतीही सोय केलेली नसणे यासाठी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जलील कुरेशी ,कबीर मोहम्मद शेख, दोघे रा. कुरेशीनगर, फलटण आणि मौलाना अमिन शेख रा. सरडे ता. फलटण यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यासंबंधी फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सचिन संभाजी पाटोळे यांनी दिली. पुढील तपास हवालदार करणे करीत आहेत.