लोणंद : लोणंद ता. खंडाळा गावचे हद्दीमध्ये लक्ष्मी प्लाझा येथील लक्ष्मी गोल्ड नावचेज्वेलर्स दुकानाच्या उद्घाटन दिवशीच सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारणाऱ्या आरोपींना जेरबंद. १ लाख ८६ हजार रुपयाचे दागिने तसेच गुन्हा करण्याकरीता वापरलेली वॅगनर कार जप्त केली आहे.
दि.९ सप्टेंबर रोजी मौजे लोणंद ता.खंडाळा गावचे हद्दीमध्ये लक्ष्मी प्लाझा येथील लक्ष्मी गोल्ड नावचे ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाच्या दिवशीच एक पुरुष व एक महिलेने हातचलाखीने दुकानातील सुमारे १ लाख ८६ हजार रुपयाचे दागिने चोरी करुन परागंद झाले होते. सदर घडले गुन्ह्याची माहीती फिर्यादिने लोणंद पोलीस ठाणेत कळविल्याने मा.उपविभागिय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी दिल्या, सुचना प्रमाणे सपोनि विशाल वायकर यांनी गुन्ह्याची उकल करण्याकरीता पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकास लोणंद शहरातील तसेच दुकानातील सीसीटिव्ही फुटेज चेक करुन आरोपीचा माग काढण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक गणेश माने व पथकाने सीसीटिव्ही फुटेजाचा मागोवा घेत, तसेच तांत्रीक विश्लेषनाचे मदतीने आरोपी हे पुणे येथील सराईत चोरटे असल्याचे निष्पन्न करुन आरोपीचा मागोवा घेवुन गुन्ह्यातील आरोपी एक महीला व एक पुरुष आरोपीस अटक केली असुन त्यांचेकडुन चोरी केलेले १ लाख ८६ हजार रुपयाचे दागिने तसेच गुन्हा करण्याकरीता वापरलेली वॅगनर कार जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.
अजयकुमार बन्सल पोलीस अधिक्षक सातारा, अजित बोऱ्हाडे अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे हायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, महीला पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार तसेच लोणंद गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस नाईक संतोष नाळे. श्रीनाथ कदम, अभिजीत घनवट, फैय्याज शेख, अविनाश शिंदे, अमोल पवार, केतन लालगे, गोविंद आंधळे तसेच महीला पोलीस अंमलदार वैशाली नेवसे, प्रिया नरुटे यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला.