फलटण : लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.
रणजीत रावसाहेब भापकर, वय 29, व्यवसाय ठेकेदार, रा. सोमंथळी, ता. फलटण, जि सातारा यांनी फिर्याद दिली असून जीवन पवन भापकर, पवन वामन भापकर, मीना बबन भापकर ,दीपाली जीवन भापकर (सर्वजण रा. सोमंथळी) आणि शुभम फरगडे रा. बोरी, ता.दौंड, जि.पुणे हल्ली रा. बारामती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 च्या सुमारास सोमंथळी, ता. फलटण गावच्या हद्दीत रणजीत रावसाहेब भापकर हे त्यांच्या घराचे जवळ घराला कंपाऊंड करीत असताना, बेकायदेशीर जमाव जमून रस्त्यावर कंपाउंड करू नका, असे म्हणत दगडाने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस हवालदार शेळके पुढील तपास करीत आहेत. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.