महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : साखर कारखानदार चोर आहेत म्हणून आम्ही एकरकमी एफ आर पी मागत होतो परंतु सध्याच्या महाराष्ट्र सरकारने शुगरकेन पेट्रोल अँक्ट 1966 चा कायदा मातीत घातला आणि या चोरांनी एफ आर पी चे दोन तुकडे केले.असे प्रतिपादन माजी कृषी राज्य मंत्री व रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पार्ले येथे जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा या राज्यव्यापी अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात केले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, भारतीय किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ, रयत क्रांती सघटनेचे सचिन नलवडे,जिल्हा अध्यक्ष मधुकर जाधव, तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील, युवा अध्यक्ष प्रकाश साबळे, पार्लेचे सरपंच आश्विनी मदने ,उपसरपंच मोहन पवार,पांडुरंग कोठावळे,राजमाची सरपंच शिवाजी डुबल , वडोली नि चे स्वातंत्र्य सैनिक शंकर पवारआदी उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना खोत म्हणाले राज्यात शेतकरी, युवकांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. राज्यसरकारने गहू तांदूळ फुकट देऊन शेतकऱ्यांच्या मालाची माती केली. कोरोना काळात सरकारने आँक्सिजन मध्ये,बेडमध्ये पैसे खाल्ले कूणालाही मोफत औषध उपचार मिळाले नाहीत.एमपीएससीच्या परीक्षा थांबवल्या मग विद्यार्थ्यांनी आभ्यास करायचा कशाला, पोलीस भरती, महाडाभरतीत घोटाळा केला.आमच्या सरकारच्या पाच वर्षाच्या काळात शेतकऱ्यांकडे पैसे नव्हते म्हणून एकही विज कनेक्शन तोडले नाही. मात्र कोरोना काळात शेतकऱ्यांना विज माफी देण गरजेचे होते. केवळ दहा ते पंधरा हजार कोटिंचा प्रश्न होता परंतु ते केले नाही. यांनी ब्ँका,दुधसंघ,कारखाने,सूतगिरण्या सारख्या संस्था खाल्ल्या या सरकारचे सर्व मंत्री भ्रष्टाचार मध्ये गुंतलेले आहेत.असा खरपूस समाचार यावेळी सदाभाऊ खोत यांनी घेतला.दरम्यान रामकृष्ण वेताळ, सचिन नलवडे यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यामध्ये टेंभू योजनेचे पाणी कराड उत्तर मधिल शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे प्राधान्याने सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासो पाटील, तर आभार डॉ कृष्णा मदने यांनी मानले.यावेळी पार्ले, वडोली निळेश्वर,सुर्ली, राजमाची,बाबरमाची,शिरवडे,बनवडी,या गावचे शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

टेंभू योजनेसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या परंतु भागातल्या शेतकऱ्यांना या योजनेचे पाणी मिळत नाही याबद्दल बोलताना खोत म्हणाले पालकमंत्री तुमच्या भागातील आहे. माणूस साखरेसारखा गोड आहे. कुणाला नाही म्हणत नाही आणि कुणाचे करतही नाही असा माणूस आहे असा रेशीम चिमटा घेत सचिन नलवडे यांनी टेंभू योजनेच्या आँफिसपुढे बेमुदत धरणे आंदोलन करा . त्यास यश आले नाही तर आपण आपल्या पालकमंत्र्यांच्या घरासमोर अचानक आंदोलन करु मी तुमच्या बरोबर आहे.अवाहन खोत यांनी केले.सचिन नलवडे यांची पश्चिम महाराष्ट्र रयत क्रांती संघटनेच्या अध्यक्ष पदी निवड…….पार्ले येथे घेण्यात आलेल्या जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा राज्यव्यापी अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी सचिन नलवडे यांची सचिन नलवडे यांची पश्चिम महाराष्ट्र रयत क्रांती संघटनेच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आले असल्याचे जाहीर केले.
































