प्रणाली कदम / महाराष्ट्र न्युज वाई प्रतिनिधी
सातारा जिल्हा अमॅच्युअर तायक्वांडो असोसिएशन यांच्याकडून भरविण्यात आलेल्या व २१ वी सातारा जिल्हास्तरीय सब ज्युनियर व कॅडेट मुले व मुली तायक्वांडो स्पर्धा २०२१ – २२ यामध्ये ब्लॅक ड्रॅगन तायक्वांडो मार्शल आर्ट अकॅडमी महाराष्ट्र राज्य ( शेंदुरजणे / वाई ) या स्पर्धे मधील विद्यार्थ्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. जगात अनेक खेळ खेळले जातात. आपल्या जीवनातील खेळाचे महत्व प्रत्येकाला माहित आहे. यांपैकी काही खेळ मैदानी तर काही घरात बसून खेळले जातात. कबड्डी, खो-खो, बेसबॉल हे खेळ आपणा सर्वांना माहित आहेत. परंतु काही खेळ असे आहेत जे फक्त खेळ नसून आपल्याला लढायला शिकवतात. किंबहुना आपला बचाव करतात. असाच एक खेळ ज्याचे प्रशिक्षण स्वयं रक्षणाकरिता घेतले जाते आणि ज्याच्या विविध स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात, तो म्हणजे कराटे. या विद्यार्थ्यांनी एकूण ११ पदके पटकावली आहेत तसेच या सर्व विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण विशाल कुमठे यांनी दिले आहे. मुलांच्या या यशामुळे पालक व त्यांच्या गावातील नागरिकांच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे. सिद्धी मालुसरे, प्रेरणा मुळीक, साक्षी सावंत, दीक्षा सावंत, वैभव भोसले, आरोही भोसले, वैष्णवी भोसले, गार्गी किरवे,जगताप ज्ञानेश्वरी, मांढरे, श्रीधर गायकवाड यांनी पदके पटकावली आहेत. तसेच आताच्या काळात मुलींनी आत्मनिर्भर राहावे कोणत्याही संकटाचा सामना करण्याची जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास मुले व मुलींच्या मध्ये निर्माण होण्यासाठी या खेळाचा उपयोग होतो.