
शेतकऱ्यांना दिवसाला १० तास वीज द्या या मागणी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी उपोषण सुरू केलेले आहे. त्यात सरकारने आंदोलनाची दखल घेतली नसल्याने राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची घोषणा राजु शेट्टी यांनी करताच फलटण तालुक्यात त्याचे पडसाद पाहवयास मिळाले. शुक्रवार दिनांक 4 मार्च रोजी जिंती नाका येथे स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते आक्रमक झाले.त्यांनी फलटण पुणे मार्गावरील जिंती नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पदाधिकारी यांना अटक करण्यात आली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र घाडगे,फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, स्वाभिमानी पक्ष तालुकाध्यक्ष दादा जाधव,उपाध्यक्ष शकील सिकंदर मणेर, शहराध्यक्ष सचिन खानविलकर, युवा आघाडी अध्यक्ष प्रमोद गाडे तसेच निखिल नाळे,अमित बैरागी,शंकरराव बोंद्रे ,प्रल्हाद अहिवळे,दंडीले उपस्थित होते
जो पर्यंत शेतकऱ्यांचा वीजेचा प्रश्न सुटत नाही, शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज मिळत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे.






















